राज्यात पावसाचा जोर वाढला! या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता, पहा हवामान विभागाचा अंदाज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Forecast In Maharashtra : महाराष्ट्रातून मान्सूनचा पतीचा प्रवास सुरू असताना पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ढग भरून येत आहेत. राज्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हात तोंडाशी आलेले पीक वायाला जात आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात 23 ऑक्टोबर पर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. 22 ऑक्टोबर दरम्यान नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तसेच चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज आहे. Weather Forecast In Maharashtra

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुढील दोन-तीन दिवस राज्यातील विविध भागात पाऊस वाढणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या माहितीनुसार मुंबईसह ठाणे पालघर या जिल्ह्यात मंगळवारी मेघगर्जनासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या कालावधीत राज्यातील अन्य भागात वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसामुळे तापमानात घट झाली आहे. मात्र तरी देखील दिवसा उन्हाचा चटका आणि सायंकाळी गारवा जाणवत आहे. वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे आरोग्याचे हानी होण्याची शक्यता आहे.

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याच्या विविध भागातील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकाचे तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, त्याबरोबर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी. असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत त्याबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता

राज्यातील अमरावती पुणे नाशिक कोल्हापूर मराठवाडा या विभागातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे व आणखीन काही दिवस होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकाचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून टाकलेले धान्य आहे. काढलेली पिके भिजले आहेत. विशेषता भात सोयाबीन तूर कापूस ऊस या पिकाचे नुकसान जास्त प्रमाणात झाले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!